Menu Close

कमलेश तिवारी यांच्या हत्येचा जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

जळगाव : हिंदु महासभेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ‘हिंदु समाज पार्टी’चे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची हत्या करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. १९ ऑक्टोबरला या विषयीचे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु महासभा, विश्‍व हिंदु परिषद, वारकरी संप्रदाय, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, गोरक्षक या संघटनांच्या प्रतिनिधींसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, तिवारी यांची १८ ऑक्टोबरला दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यामागे हिंदु नेत्यांना संपवण्याचे षड्यंत्र दिसून येते. १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये याचप्रमाणे हिंदु नेत्यांच्या हत्या करण्यात आल्या. गेल्या आठवड्यात मुर्शीदाबाद (बंगाल) येथील संघाचे स्वयंसेवक श्री. बंधु प्रकाश पाल यांची त्यांच्या कुटुंबियांसह निर्घृण हत्या करण्यात आली होती. हिंदु संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हत्या करून दहशत निर्माण करणे, हा या देशविरोधी शक्तींचा हेतू आहे.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या

१. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या देशविरोधी विचारसरणीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

२. कमलेश तिवारी यांना सुरक्षा प्रदान केलेली असतांनाही त्यांची हत्या कशी काय होते ? याचा शोध घेऊन सुरक्षा रक्षकांचीही चौकशी व्हायला हवी.

३. तिवारी यांचा शिरच्छेद करणार्‍यास ५१ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केलेल्या मौलानांचे चिथावणीखोर व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमावरून प्रसारित झालेले आहेत. अशा मौलानांच्या मुसक्या आवळायला हव्यात.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *