- पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ ठार !
- हिंदु व्यक्तीकडून त्याचे फेसबूक खाते ‘हॅक’ झाल्याच्या आरोपावरून ३ जण कह्यात !
भारतात कमलेश तिवारी या हिंदुत्वनिष्ठ नेत्याची हत्या झाल्यावर कुठेही हिंसात्मक घटना घडल्या नाहीत. देशभरात संतापाची लाट असूनही हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गानेच लढा उभारला आहे. ही हिंदूंची सहिष्णुताच आहे, हे लक्षात घ्या !
दुसरीकडे बांगलादेशमध्ये एका हिंदु व्यक्तीचे फेसबूक खाते ‘हॅक’ करून ‘त्याने इस्लामविरोधी पोस्ट केली’, असा कांगावा करत धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण केले जाते. यातून सहिष्णु कोण आणि असहिष्णु कोण, हे वेगळे सांगायला नको !
ढाका : एका हिंदु युवकाच्या कथित इस्लामविरोधी ‘फेसबूक पोस्ट’वरून बांगलादेशातील पश्चिमी भोला जिल्ह्यात धर्मांधांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. धर्मांधांनी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलीस अधिकार्यांवर आक्रमण केले. (हिंदूंना असहिष्णु ठरवणारे धर्मनिरपेक्षतावादी, पुरो(अधो)गामी, काँग्रेसी आदी अशा प्रकरणात मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) जिल्ह्याचे पोलीसप्रमुख सरकार महंमद कैसर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वसंरक्षणार्थ आणि जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यामध्ये ४ आंदोलनकर्ते ठार झाले असून ५० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. घायाळ झालेल्यांमध्ये पोलीस कर्मचार्यांचाही समावेश आहे.
राजधानी ढाक्यापासून ११६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिमी भोला जिल्ह्यातील अनेक धर्मांध ‘मुस्लिम तोहिद जनता’ या फलकाखाली आंदोलन करत होते. महंमद पैगंबर यांचे कथित अवमान करणारे लिखाण फेसबूकवर पोस्ट करणार्या हिंदु व्यक्तीला पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. या हिंदु व्यक्तीने आरोप केला आहे की, तिचे फेसबूक खाते ‘हॅक’ करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी ‘हॅकिंग’च्या आरोपावरून ३ जणांना कह्यात घेतले आहे.
‘दैनिक जनसत्ता’ने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१६ मध्ये एका अल्पसंख्याक हिंदु व्यक्तीने कथित रूपाने केलेल्या इस्लामविरोधी फेसबूक पोस्टवरून बांगलादेशातील कट्टरपंथी समुदायाने हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात