आयुर्वेदाचे महत्त्वच लक्षात न घेतल्याने महागड्या उपचारपद्धतींमुळे नागरिकांची लूट होते. असाध्य ते साध्य करून दाखवण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. त्यासाठी या अमूल्य अशा शास्त्राकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोन पालटला पाहिजे !
मुंबई – एक साध्वी म्हणाल्या की, गोमूत्र प्यायले आणि माझा कर्करोग बरा झाला. तेव्हा तो टीकेचा विषय झाला; पण भारतीय आयुर्वेदातील सगळ्याच उपचारांना तुम्ही वेड्यात काढू नका. तुम्ही ‘अॅलोपॅथी’ उपचार करा, त्यासह हेही करा आणि सकारात्मक राहा, असे प्रतिपादन एका वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात अभिनेते आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद पोंक्षे यांनी नुकतेच केले. कर्करोगाला बळी पडल्यावर गंभीर व्याधीशी यशस्वीपणे कशी झुंज दिली ?, याविषयी श्री. पोंक्षे यांनी कार्यक्रमात अनुभवकथन केले.
श्री. पोंक्षे यांनी प्रदीर्घ काळानंतर रंगभूमीवर पुनरागमन केले आहे.
ते पुढे म्हणाले की,
१. माझी पत्नी डॉ. शिवानंद यांच्या संस्थेत शिवयोगाची आराधना करते. त्यांनी विज्ञानाच्या पलीकडेही काही तत्त्वज्ञान मांडले आहे. आयुर्वेदात अनेक अशी औषधे आहेत की, त्यांच्यामुळे आपल्या व्याधी बर्या होऊ शकतात.
२. तुळस, कडुलिंब, बेलपत्र यांचा काढा उपयुक्त आहे. केमोथेरपीने (कर्करोग रुग्णांवरील उपचारपद्धत) जी प्रतिकारक्षमता संपते, ती यामुळे वाढते. रक्ताच्या चाचण्याही चांगल्या येतात.
३. प्रतिदिन सकाळी शुद्ध गोमूत्र प्राशन केले, तर ते कर्करोगाच्या पेशी मारण्याचे मोठे कार्य करते. यात कुठेही भोंदूगिरी नाही. हे विज्ञान आहे. मी याप्रमाणे कृती केल्यावर माझ्या रक्तातील पांढर्या पेशी सामान्य व्यक्तीप्रमाणे आल्या.
४. प्रत्येकी १५ दिवसांनी एक केमोथेरपी असते. ६ मासांत ती पूर्ण झाली पाहिजे. केमोथेरपी घेण्यासाठी आवश्यक चाचण्या सामान्य (नॉर्मल) नसल्याने अनेकांचा चाचणीचा कालावधी लांबतो. मी डॉ. शिवानंद यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे उपचार चालू केले आणि बरोबर ६ मासांनी माझी शेवटची केमोथेरपी झाली, तसेच मी कर्करोगातून संपूर्णपणे चांगला झालो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात