Menu Close

पनवेलमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा उच्छाद !

रेल्वेस्थानकाच्या परिसरात पत्रके वाटतांना हिंदुत्ववाद्यांनी दिले पकडून !

candle-coptic-christianपनवेल : येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात काही धर्मपरिवर्तीत झालेली ख्रिस्ती मंडळी हिंदूंची फसवणूक करणारी पत्रके वाटत असतांना येथील काही हिंदुत्ववाद्यांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले. हे ख्रिस्ती धर्माची पत्रके वाटून लोकांचे फसवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असले, तरी पोलिसांनी मात्र रेल्वेच्या हद्दीत प्रसार करणारी पत्रके वाटल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे.

हिंदुत्ववाद्यांनी रेल्वे स्थानकावर या ख्रिस्ती धर्मप्रसारकांना हटकले असता त्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी रस्त्यावरून जाणारे अन्य काही धर्माभिमानीही हिंदुत्ववाद्यांना साहाय्य करण्यासाठी पुढे आले. या ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्‍यांची नावे हिंदूंचीच असल्याचे या वेळी लक्षात आले.

धर्माभिमानी पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर कारवाई करण्यास फारसे उत्सुक दिसत नव्हते. कोणीतरी हिंदु धर्मीय तक्रार करत आहेत म्हणून कारवाई करायची, असा त्यांचा आविर्भाव होता. अखेर धर्माभिमान्यांच्या संघटित कृतीमुळे ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर त्यांना कारवाई करावी लागली.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदूंना आवाहन केले आहे की, शासकीय मालमत्तेमध्ये घुसून अशा प्रकारे अवैधरीत्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना कोणाला आढळल्यास त्वरित त्यांना हटकून पोलिसांच्या कह्यात द्या आणि त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी करा. पनवेल शहरात केवळ २ सहस्रांच्या आसपास ख्रिस्ती रहात असूनही ८ चर्च उभी राहिली आहेत. पनवेल शहरातील या चर्चना पैसा कोण पुरवते, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही हिंदुत्ववादी करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *