पाक पोलिसांच्या मारहाणीत २ जणांचा मृत्यू, ८० घायाळ
- पाकिस्तानी पोलिसांचा हिंसक चेहरा उघड !
- भारतात अल्पसंख्याकांवर आक्रमणे झाल्यावर ‘मानवाधिकारांचे हनन झाले’, अशी ओरड करणार्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना आता गप्प का ? पाकच्या या हिटलरशाहीवर भारतातील पाकप्रेमी काही बोलतील का ?
नवी देहली : पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथे नागरिकांनी पाकिस्तान सरकारविरोधात, तसेच स्वातंत्र्याची मागणी करण्यासाठी २२ ऑक्टोबरला शांततामय मार्गाने मोर्चा काढला होता. या मोर्चावर पाकिस्तानी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच अमानुष लाठीमार केला. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून ८० जण घायाळ झाले.
२२ ऑक्टोबर १९४७ या दिवशी पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. या ७२ व्या घुसखोरीदिनाचा ‘काळा दिवस’ म्हणून निषेध नोंदवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळया पक्षांनी एकत्रित येऊन मोठ्या संख्येने मोर्चा काढला. या मोर्चानंतर पाक सैन्याने मुझफ्फराबादमध्ये आपत्कालीन स्थितीची घोषणा केली आहे. २३ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक नेत्यांना अटक केली. पाक सैन्याने मुझफ्फराबादमधील प्रेस क्लबमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे काही पत्रकारही घायाळ झाले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात