-
वरिष्ठ पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक आदींनी धर्मांधांना स्वत:हून संपर्क करून कारवाई करण्याचे दिले आश्वासन
-
धर्मांधांच्या दबावापुढे झुकली मेरठ (उत्तरप्रदेश) येथील पोलीस यंत्रणा !
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर होणार्या चिखलफेकीच्या विरोधात पोलीस कधी अशी तत्परतेने कारवाई करतात का ?
मेरठ (उत्तरप्रदेश) : येथील सरधना भागातील एका हिंदु युवकाने महंमद पैगंबर यांच्याविषयी फेसबूकवरून कथित रूपाने केलेल्या पोस्टच्या विरोधात धर्मांधांनी पोलीस ठाण्याला घेरले. हे वृत्त पसरताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक आणि अन्य पोलीस अधिकारी यांनी धर्मांधांना तत्परतेने संपर्क करून आरोपी हिंदु युवकाच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मेरठ शहरातील शुभम आर्य नावाच्या हिंदु युवकाने २२ ऑक्टोबर या दिवशी फेसबूकवरून ही पोस्ट केली होती. थोड्याच वेळात ती ‘व्हायरल’ (प्रसारित) झाली. शुभमने ती पोस्ट लगेच पुसल्यावरही (डिलीट) अनेकांनी त्याचा ‘स्क्रीनशॉट’ काढून घेतला होता. यानंतर शेकडो धर्मांधांनी पोलीस ठाण्याला घेरले आणि त्या युवकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ते करू लागले. वातावरण तणावपूर्ण झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात