हिंदु जनजागृती समितीचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर : फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदूंंच्या देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखा, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, हिंदू महासभेचे सर्वश्री मारुति मिरजकर, बबन हरणे, संतोष पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखा
दिवाळीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते. याचा अपलाभ घेत अनेक व्यापारी मिठाईसाठी लागणारा कच्चा माल, उदा. तूप, खवा, वर्ख इत्यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ करतात. यामागे अधिक नफेखोरीच्या उद्देशाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात घातले जाते. भेसळयुक्त मिठाईच्या सेवनाने गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तरी शासनाने मिठाई बनवणार्या व्यापार्यांची नियमित तपासणी करावी आणि भेसळयुक्त मिठाई बनवणार्या व्यापार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मिरज आणि जयसिंगपूर येथेही निवेदन
वरील मागणीसाठी मिरज (सांगली जिल्हा) येथे प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या समवेत सनातन प्रभातचे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड उपस्थित होते. जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सूळ यांना निवेदन देण्यात आले.
सातारा येथे जिल्हाधिकारी आणि तालुका फटाका असोसिएशनचे अध्यक्ष यांना निवेदन
सातारा : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. योग वेदांत सेवा समिती, हिंदु महासभा यांनी पाठिंबा दर्शवला. सातारा तालुका फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दीपक शिंदे यांनाही निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शिवराज तलवार, श्री. संकेत शिंदे, सनातन संस्थेचे श्री. राहुल कोल्हापुरे आणि समितीचे श्री. हेमंत सोनवणे, श्री. आनंदराव पाडळे उपस्थित होते.
कराड येथे तहसीलदारांसह पोलीस प्रशासनालाही निवेदन दिले
कराड : येथे समितीच्या वतीने कराडचे नायब तहसीलदार विजय माने शहर पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे शशिकांत हापसे, सनातन संस्थेचे सर्वश्री लक्ष्मण पवार, बाबुराव पालेकर, अरुण जाधव, सुरेंद्र भस्मे आणि समितीचे श्री. मदन सावंत उपस्थित होते.