Menu Close

फटाक्यांच्या माध्यमातून होणारी राष्ट्रहानी रोखण्यासाठी मुंबईच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

राष्ट्रप्रेमींकडून निवेदन स्वीकारतांना मुंबई जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे (उजवीकडे)

मुंबई : फटाक्यांवरील देवतांची आणि राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले फटाके फोडल्यावर त्यांची विटंबना होते. त्यामुळे अशा फटाक्यांच्या विक्रीला प्रतिबंध करावा, असुरक्षित चिनी फटाक्यांची विक्री आणि मिठाईत होणारी भेसळ रोखावी, तसेच हिंदूंच्या हत्या रोखण्यात अपयशी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, याविषयीचे निवेदन मुंबई जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना देण्यात आले. या वेळी शिवकार्य प्रतिष्ठानचे सर्वश्री प्रभाकर भोसले, सर्वश्री करूण पालांडे, धर्मप्रेमी श्री. विजय मिश्रा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार, श्री. परेश कोळी आणि  सनातन संस्थेचे श्री. अनिल नाईक उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *