वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजेच अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यतेचे द्योतक आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. दिवाळीच्या एक दिवस आधी ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात अमेरिकी-भारतीय यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली. त्या वेळी अमेरिकेतील हिंदु, जैन, शीख आणि बौद्ध यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतांना त्यांनी वरील विधान केले. या कार्यक्रमात प्रसिद्धीमाध्यमांना प्रवेश नव्हता. (एरव्ही मानवाधिकाराविषयी गळे काढणारी अमेरिका स्वतः मात्र वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करते, हेही तितकेच सत्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
ते पुढे म्हणाले की, अमेरिकी राज्यघटनेने या देशातील लोकांना दिलेल्या अधिकारांचे माझ्या प्रशासनाने रक्षणच केले आहे. या देशातील सर्व धर्मियांना त्यांच्या प्रथा आणि विवेक यांनुसार पूजा करण्याचा अधिकार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात