Menu Close

देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांची वेष्टने असणारे आणि चिनी फटाके यांच्या विक्रीवर निर्बंध आणा !

  • पालघरच्या निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

  • ठाणे जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि फटाके विक्रेते यांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना पालघर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी (उजवीकडे)

पालघर : सध्या बाजारात देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके उपलब्ध होतात. श्री लक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीविष्णु यांसारख्या देवतांची, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारख्या राष्ट्र्रपुरुषांची चित्रे फटाक्यांवर सरार्स छापलेली आढळतात. ते फटाके दिवाळीच्या काळात सर्वत्र फोडले जातात. त्यामुळे त्यावरील चित्रांच्या चिंधड्या उडून ते रस्त्यावर विखुरले जाऊन पायाखाली येतात. यामुळे देवतांची आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना होते. ती विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेली १४ वर्षे वैध मार्गाने जागृती करत आहे.

निवेदन स्वीकारतांना बोईसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आशिष पाटील

बाजारात मोठ्या प्रमाणात चिनी फटाके आले आहेत. भारतात प्रतिबंधित असलेले रासायनिक मिश्रण यात असते. त्यामुळे अशा घातक चिनी फटाक्यांच्या विक्रीला प्रतिबंध करावा. तसेच मिठाईत होणारी भेसळ रोखावी, या विषयांचे निवेदन पालघर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने देण्यात आले.

या वेळी धर्मप्रेमी अधिवक्ता किसन यादव, श्री. महेश मुळे, सनातन प्रभातचे वाचक श्री. चंद्रप्रकाश आदिवाल, तसेच सनातन संस्थेचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या विषयाचे निवेदन बोईसर आणि पालघर पोलीस ठाणे येथेही देण्यात आले.

ठाणे : फटाक्यांच्या माध्यमातून होणारी देवतांची घोर विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखला जावा अन् अवैधरित्या चिनी फटाके विकणार्‍यांवर कारवाई करावी, यासाठी ठाणे जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांना निवेदन देण्यात आले.

ठिकठिकाणी पोलीस ठाण्यात निवेदने

मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी
अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी
बदलापूर येथे फटक्याच्या दुकानात निवेदन देताना धर्मप्रेमी

ठाणे येथील राबोडी पोलीस ठाण्यातील उपपोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दादाहरी चौरे यांनी फटाक्यांच्या माध्यमातून होणारे विडंबन रोखण्यासाठी निवेदन दिले. निवेदन देतांना दावडीगाव येथील धर्माभिमानी सर्वश्री हरिशंकर पांडेय, रवींद्रनाथ तिवारी, रविंद्र अग्रहारी, मिथिलेश दुबे, कपिल पांडेय, शिवम ओझा आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदीप अग्निहोत्री सहभागी झाले होते.

बदलापूर पश्‍चिम येथे पोलीस ठाणे आणि ‘बदलापूर फटाके असोसिएशन’ यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी बदलापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धर्मप्रेमी सर्वश्री प्रसाद दळवी, अतुल डाके आणि मंथन पडवळ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री वीरेश अहिर आणि उल्हास चौधरी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्या फटाकेविरोधी जनजागृती मोहिमेच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात झालेल्या घडामोडी

१. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांना निवेदन दिल्यावर त्यांनी त्यांच्या नातवंडांसाठी आणलेल्या फटाक्यांवर देवतांची चित्रे नाहीत ना, हे पाहिले, तसेच समितीच्या कार्याचे कौतुक केले. सांगली शहरात नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर आणि सौ. भारती दिगडे यांना निवेदन देण्यात आले. हरिपूर येथील सरपंच श्री. हणबर आणि पोलीस पाटील श्री. बोंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

२. ‘अल्फान्सो इंग्लिश स्कूल’च्या शिक्षिका, तसेच गुरुमाऊली बचत गटाच्या सौ. अर्चना जाधव यांना निवेदन देण्यात आले.

३. तुंग येथे सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांना निवेदने देण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *