धर्मांधांकडून आतापर्यंत दक्षिण भारत, उत्तरप्रदेश, बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. आता त्याचे लोण आसाममध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचले आहे. यावरून हिंदुबहुल देशात हिंदु असुरक्षित आहेत, हेच दिसून येते. देशातील हिंदूंना सुरक्षित करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
गौहत्ती : आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना सोशल मीडियाच्या (सामाजिक प्रसारमाध्यमाच्या) माध्यमातून येथील एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या कर्मचार्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी मनीरुद्दीन रहमान याला अटक केली आहे. मनीरुद्दीन हा ‘सूरजित हर्ष’ या बनावट नावाने फेसबूक खाते चालवत होता. (धर्मांधांची हिंदूंना कलंकित करण्याची क्लृप्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या प्रकरणी पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले की, रहमान याने आसामी भाषेत प्रसारित केलेले लिखाण मुख्यमंत्र्यांचा अपमान करणारे आणि जिवे मारण्याची धमकी देणारे होते. त्या लिखाणात त्याने म्हटले होते की, जर माझ्याकडे (रहमानकडे) पिस्तुल असती, तर त्याने सोनोवाल यांना गोळी घातली असती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात