भारताकडून आक्षेप आणि कारवाईची मागणी
भारताने पाकच्या काश्मीरविषयीच्या क्लृप्त्या उधळून पाकवरच कठोर कारवाई करणे आवश्यक !
नवी देहली : पाकिस्तानने जगभरातील स्वतःचे राजदूतावास आणि उच्चायुक्त कार्यालय यांमध्ये गेल्या २ मासांपूर्वी ‘काश्मीर कक्ष’ (काश्मीर सेल्स) चालू केले आहेत. यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवत अन्य देशांशी संपर्क साधत ‘सर्व देशांनी त्यांच्या भूमीत कार्यरत असलेल्या या कक्षांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी’, कारवाईची मागणी केली आहे. याचसमवेत परराष्ट्र मंत्रालयाने विविध देशांच्या राजधानीत असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकार्यांना ‘पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचे सूत्र उपस्थित करावे’, असे सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे की, पाकने काश्मीर कक्ष चालू करण्यामागे ‘विविध देशांत असलेल्या स्थानिक पाकिस्तानी नागरिकांना भडकावणे आणि खोट्या प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे कट्टरतावाद निर्माण करणे’, हा मुख्य हेतू आहे. हे कक्ष हिंसाचाराला उघड प्रोत्साहन देत असल्यामुळे ते बंद करायला हवेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात