असे व्हायला हा भारत आहे कि पाकिस्तान ! हिंदूबहुल देशात हिंदूंवर ही वेळ यावी, हे दुर्दैवी आहे ! उद्या अशी स्थिती सर्वत्र येण्यापूर्वीच सरकारने यावर कठोर पाऊल उचलायला हवे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
धर्मांध हे हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे करून दहशत निर्माण करतात, हे तर नित्याचेच झाले आहे. येणार्या काळात धर्मांध हे दिवाळी किंवा अन्य सण- उत्सव साजरे करणार्यांवरही आक्रमणे करतील, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे !
मुंबई : मुसलमान शेजारी आम्हाला दिवाळी साजरी करू देत नाहीत, अशी तक्रार विश्व भानू या चित्रपट अभिनेत्याने पंतप्रधान श्री. मोदी यांना ट्वीट करून केली आहे. अभिनेते फरहान अख्तर यांच्या ‘एक्सेल एन्टरटेन्मेंट’ या आस्थापनात भानू काम करतात.
मालाड मालवणी परिसरात राहणारे भानू हे मुसलमानांच्या सोसायटीत राहतात. ‘या सोसायटीतील धर्मांध व्यक्ती त्यांच्या पत्नीला घराबाहेर दिवे लावणे आणि रांगोळी काढणे यासाठी विरोध करतात. काही धर्मांधांनी हे दिवे विझवून टाकले, तसेच धर्मांधांनी दिवे न लावण्याविषयी आणि काढण्याविषयी त्यांना बळजोरी केली’, असे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
अन्य एका घटनेत काही धर्मांध मुले हिंदुच्या घरांसमोरील रांगोळी पुसत असल्याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
सीसीटीव्ही छायाचित्रकामुळे ही घटना उघड झाली आहे. (यावरून धर्मांध त्यांच्या मुलांमध्ये बालपणापासूनच कसा हिंदुद्वेष भिनवतात, हेच दिसून येते ! ही स्थिती हिंदूंना विचार करण्यास लावणारी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या घटनेमुळे भानू यांनी केलेल्या विधानाला पुष्टी मिळत आहे, अशी चर्चा हिंदूंमध्ये आहे.
हिंदूंनी त्यांचे सण हिंदुस्थानात साजरे करायचे नाही, तर मग पाकिस्तानात साजरे करायचे का ? – श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, कोल्हापूर
ऐन दीपावलीत हिंदूंना त्रास देणे, त्यांना दीपावली साजरी करू न देणे, असे प्रकार दोन दिवसांत घडले आहेत. हे प्रकार ऐकल्यावर हिंदूंचे सण हिंदूंनी हिंदुस्थानात साजरे करायचे नाही, तर मग पाकिस्तानात साजरे करायचे का ? असा प्रश्न प्रत्येक हिंदूच्या मनात उपस्थित होत आहे. अल्पसंख्याक त्यांचे सण जेव्हा साजरे करतात, तेव्हा त्यांना हिंदू कधीही विरोध करत नाहीत. प्रतिदिन दिवसातून पाच वेळा देण्यात येणार्या ‘अजान’चा आवाज हिंदूंना सहन करावा लागतोच ना ? त्यामुळे हिंदूंच्या देशात हिंदूंना सण साजरे करण्यापासून रोखणे, हे सहन करण्यासारखे नाही. हा प्रकार गंभीर असून सरकारने याची त्वरित नोंद घ्यायला हवी, तसेच हिंदूंना असे करण्यापासून कोणी रोखत असेल, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला हवी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात