सातारा : महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भरघोस मतांनी विजयी झाले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे, महेंद्र निकम, माजी नगरसेविका सौ. लीलाताई निंबाळकर उपस्थित होत्या.
या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दीपावलीचे शुभेच्छापत्रक आणि वर्ष २०२० चे सनातन पंचांग देऊन दीपावलीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.