Menu Close

चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालण्याच्या विषयात लक्ष घालू ! – भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली : फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदूंंच्या देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने  २६ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणात ‘आम्ही योग्य ते लक्ष घालू’, अशी ग्वाही आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी या वेळी दिली.

आमदार गाडगीळ यांना दीपावलीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा !

सांगली विधानसभा मतदारसंघातील नूतन आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छापत्र देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने, सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर आणि दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. अजय केळकर उपस्थित होते.

Related News

0 Comments

  1. Vikram

    Yes. It will be worse in India where there are state governments sympathetic to Islamic jihadis, political parties who will not act against jihadis and plenty of muslims who will provide logistical support to these murderers. I do not think Modi has the courage to deal with them either.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *