Menu Close

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लोकप्रतिनिधींना शुभेच्छा !

सनातन पंचांग २०२० स्वीकारतांना मध्यभागी भांडुप (प.) चे आमदार रमेश कोरगावकर

दीपावलीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून भांडुप (प.), चेंबूर, बेलापूर या विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या भेटी घेऊन दीपावली शुभेच्छा, भेटकार्ड आणि ‘सनातन पंचांग २०२०’ देण्यात आले. भांडुप (प.) येथील शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. ‘आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !’, असे समितीच्या कार्यकर्त्यांनी म्हटल्यावर ‘हे अत्यंत महत्त्वाचे आहे’, असे श्री. कोरगावकर म्हणाले. त्यांनी राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याविषयीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

(डावीकडे)चेंबूरचे आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर यांना सनातन पंचांग भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
(डावीकडे) भाजपच्या बेलापूरच्या आमदार सौ. मंदा म्हात्रे यांना सनातन पंचांग भेट देतांना सनातनच्या सौ. देसाई

चेंबूर विधानसभा क्षेत्रामधून निवडून आलेले शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी, तर भाजपच्या बेलापूर विधानसभा क्षेत्रातील आमदार सौ. मंदा म्हात्रे यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली.

आमदार श्री. दिलीपमामा लांडे यांना सनातन पंचांग देतांना सर्वश्री सतीश सोनार आणि बबन वाळूंज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चांदिवली (मुंबई) येथील नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार श्री. दिलीपमामा लांडे यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ‘सनातन पंचांग’ भेट देण्यात आले. सर्वश्री सतीश सोनार आणि बबन वाळूंज यांनी त्यांची भेट घेतली. घाटकोपर (पश्‍चिम) येथील भाजपचे आमदार श्री. राम कदम यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देऊन ‘सनातन पंचांग’ भेट देण्यात आले.

पनवेल

पू. शिवाजी वटकर यांच्याकडून भेट स्वीकारतांना आमदार श्री. प्रशांत ठाकूर

पनवेल येथील भाजपचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांची हिंदु जनजागृती समितीचे पू. शिवाजी वटकर, सनातन संस्थेच्या सौ. नीला गडकरी आणि श्री. निनाद गाडगीळ यांनी भेट घेतली. भरघोस मतांनी विजय झाल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले, तसेच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांना सनातनच्या वतीने दीपावलीचे शुभेच्छापत्र, सनातननिर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि प्रसाद दिला. तसेच सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमभेटीचे निमंत्रण दिले. या वेळी त्यांनी आमंत्रण स्वीकारून ‘लवकरच आश्रमास भेट देण्यासाठी येऊ’, असे सांगितले.

अकोला

१. श्री. रणधीर सावरकर यांना सनातन पंचांग देतांना श्री. खोत
श्री. गोवर्धन शर्मा (उजवीकडे) यांना ‘सनातन पंचांग’ भेट देतांना श्री. अजय खोत

अकोला पूर्व मतदारसंघाचे भाजपचे विजयी उमेदवार श्री. रणधीर सावरकर यांना, तसेच अकोला पश्‍चिम मतदारसंघाचे भाजपचे विजयी उमेदवार श्री. गोवर्धन शर्मा यांना ‘सनातन पंचांग’ भेट देऊन श्री. अजय खोत आणि सौ. मेघा जोशी यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

आमदार कालिदास कोळंबकर (डावीकडे) यांना पंचांग देतांना चंद्रकांत भदिर्के, बाजूला सौ. शर्मिला बांगर

हिंदु जनजागृती समितीचे श्री. चंद्रकांत भदिर्के आणि सनातन संस्थेच्या सौ. शर्मिला बांगर यांनी भाजपचे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार कालिदास कोळंबकर यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२०’, तसेच दैनिक सनातन प्रभातचा दिवाळी विशेषांक भेट दिला. या वेळी आमदार कालिदास कोळंबकर यांनी अन्यांना भेट देण्यासाठी १ सहस्र सनातन पंचांग घेतले.

आमदार अजय चौधरी (उजवीकडे) यांना पंचांग दाखवतांना अरविंद पानसरे, बाजूला सौ. कमल देशमुख

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. अजय चौधरी यांची भेट त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विजयी झाल्याविषयी अभिनंदन करून त्यांना वर्ष २०२० चे सनातन पंचांग भेट दिले.

या वेळी सनातनच्या साधिका सौ. कमल देशमुख उपस्थित होत्या.

डावीकडून श्रीमती रूपा वैद्य, पंचांग स्वीकारतांना आमदार सौ. मनीषा चौधरी, बाजूला सदानंद पांचाळ, देवीदास देवळे

दहिसर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सौ. मनीषा चौधरी यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. सदानंद पांचाळ, श्री. देवीदास देवळे, सनातनच्या साधिका श्रीमती रूपा वैद्य यांनी भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या अन् सनातन पंचाग भेट दिले.

आमदार श्री. सुधीर गाडगीळ (उजवीकडे) यांना दीपावलीचे शुभेच्छापत्र देतांना दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी, तसेच समितीच्या कार्यकर्त्या

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *