कोल्हापूर : २५ ऑक्टोबर या दिवशी सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांत विविध गोप्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, गोपूजक, तरुण मंडळे, विविध संस्था, नागरिक यांच्याकडून उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात गोपूजन करण्यात आले.
१. मिरज शहरात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पुढाकार घेऊन गोपूजन करण्यात आले. संयुक्त मंगळवार पेठ, विघ्नराज गणेशोत्सव मंडळ, संभा तालीम, भोसले चौक, हरबा तालीम यांसह शहरात विविध ठिकाणी गोपूजन करण्यात आले.
२. सांगली शहरात पांजरपोळ येथे, तसेच कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भाग येथेही विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने गोपूजन करण्यात आले.
३. बेळगाव जिल्ह्यातील नंदीहळ्ळी येथे श्री लक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने सामूहिक गोवत्स पूजन करण्यात आले. सर्वप्रथम सौ. उज्ज्वला गुरव यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी गोमातेला सामूहिक प्रदक्षिणा घातली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. यल्लाप्पा पाटील यांनी उपस्थितांना गोमातेचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी सर्वश्री सिद्राई जाधव, विजय पाटील, परशुराम नीडलकर, महेश संडेकर, नागराज सुतार, राहुल सुतार, शाम गुरव, मधु पाटील यांसह गावातील वारकरी, महिला आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.