पुणे : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी ठरलेल्या आमदारांच्या सदिच्छा भेटी घेण्यात आल्या.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, चिंचवड येथील श्री. लक्ष्मण जगताप, भोसरी येथील महेश लांडगे, मावळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, कसबा विधानसभा मतदारसंघाच्या सौ. मुक्ता टिळक, महायुतीचे सुनील कांबळे यांना समितीच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२०’ भेट म्हणून देण्यात आले. वाहतूककोंडीची समस्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जुन्या वाड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तसेच शनिवारवाड्याचे संवर्धन करण्यासाठी येत्या ५ वर्षांत प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार सौ. मुक्ता टिळक यांनी या वेळी सांगितले. श्री. सुनील शेळके यांनी समितीचे श्री. सुधीर धोंगडे यांना वाकून नमस्कार केला, तसेच गर्दी असतांनाही समितीच्या कार्यकर्त्यांची सर्वप्रथम भेट घेऊन ‘मी तुमच्या सर्वांसाठीच आहे’, अशी भावना व्यक्त केली.