बोईसर (जिल्हा पालघर) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील फटाके विक्रेत्यांना निवेदन देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात आले. देवतांची आणि राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले, चिनी बनावटीचे आणि लहान बालके, वृद्ध नागरिक आणि रुग्णाईत यांना त्रासदायक ठरणारे मोठ्या आवाजाचे फटाके विक्रीसाठी न ठेवण्याचे आवाहन या वेळी विक्रेत्यांना करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंडित चव्हाण, श्री. आनंद पाटील आणि श्री. महादेव होनमोरे उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. येथील फटाके विक्रेत्यांनी सांगितले, ‘‘या ठिकाणी फटाक्यांची एकूण ३० दुकाने आहेत. आम्ही पाच-सहा वर्षांपूर्वी आधीच घाऊक व्यापार्यांना ‘देवतांची चित्रे असलेले फटाके आम्ही घेणार नाही’, असे सांगितले आहे. व्यापारीही तसे फटाके आम्हाला पाठवत नाहीत.’’
२. १२ फटाके विक्रेत्यांनी समितीच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले आणि त्यांनी ‘सनातन पंचाग’ही विकत घेतले.
३. फटाके घेण्यासाठी आलेल्या एका गृहस्थांनी दोन गुजराती पंचांग घेतले आणि समितीच्या कार्याचे कौतुक केले. ‘कपड्यांवरही देवतांची चित्रे छापली जातात, ते अयोग्य आहे. त्या संदर्भात समिती काही कार्य करणार असेल, तर मी त्यात सहभागी होईन’, असे एका गृहस्थांनी या वेळी सांगितले.