वाराणसी येथील हिंदुत्वनिष्ठांचे शासनाला निवेदन
वाराणसी (उत्तरप्रदेश) : ‘अश्लीलता पसववून भारतीय संस्कृतीवर घाला घालणार्या आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या ‘कलर्स टीव्ही’ या हिंदी वाहिनीवरील ‘बिग बॉस १३’ कार्यक्रमावर बंदी आणावी आणि या कार्यक्रमाचे निर्माते-निर्देशक यांच्यावर त्वरित कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हा न्यायदंडाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी हिंदु जागरण मंचाचे प्रदेश अध्यक्ष अधिवक्ता दिनेश नारायण सिंह, ‘इंडिया विद विजडम’चे अधिवक्ता अनुराग पांडे, अधिवक्ता अरुण मौर्या, अधिवक्ता संजीवन यादव, अधिवक्ता विकास तिवारी, अधिवक्ता रतनदीप सिंह, हिंदु जागरण मंचाचे श्री. रवि श्रीवास्तव, धर्मनिष्ठ श्री. आकाश पांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी आणि अन्य धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
‘कलर्स टीव्ही’ या हिंदी दूरचित्रवाहिनीवरील ‘बिग बॉस १३’मध्ये ‘बेड फ्रेंड्स फॉरेव्हर’ ही अत्यंत अश्लाघ्य आणि संस्कृतीहीन संकल्पना कृतीत आणण्यात आली आहे. यानुसार स्पर्धकांना त्यांच्या जोड्या सुरुवातीला निवडण्यास सांगितल्या आहेत. संपूर्ण सिझनमध्ये संबंधित जोड्या एकाच पलंगावर (बेडवर) झोपणार आहेत. यामध्ये काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकांनाही जोडीदार म्हणून निवडले आहे. त्यामुळे एक महिला दुसर्या पुरुषासह एकाच पलंगावर, तेही एकाच पांघरूणात एकत्र झोपणार आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनातून करण्यात आलेल्या अन्य मागण्या . . .
१. अन्य धर्मांमधील बळीप्रथेवर कोणतेही निर्बंध न घालता केवळ हिंदूंच्या धार्मिक प्रथांवर बंदी आणण्याच्या हेतूने त्रिपुरा येथील श्री त्रिपुरासुंदरी मंदिरातील बळीप्रथेवर न्यायालयाद्वारे बंदी आणण्यात आली आहे. ही बंदी हटवण्यासाठी केंद्रसरकारने हस्तक्षेप करावा.
२. हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर हेतूपुर:स्सर दगडफेक करून दंगल घडवणार्या आणि सामाजिक सलोखा बिघडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी.