Menu Close

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर येथे ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ !

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ !

आंदोलनात सहभागी राष्ट्र आणि धर्मप्रेमी

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) : विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर (तेलंगण) या २ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त उत्तरप्रदेश येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यात आला. यासह विविध मागण्याही करण्यात आल्या.

त्यात ‘अश्‍लीलता पसरवून भारतीय संस्कृतीवर घाला घालणार्‍या ‘कलर्स टीव्ही’ या हिंदी वाहिनीवरील ‘बिग बॉस १३’ कार्यक्रमावर बंदी घालावी; त्रिपुरा येथील श्री त्रिपुरासुंदरी मंदिरातील पशूबळीवर न्यायालयाने बंदी आणली आहे. या बंदीला विरोध करण्यासाठी सरकारने कायदा करावा’, या मागण्यांसह आंध्रप्रदेशमध्ये दसर्‍याच्या कालावधीत रेल्वे तिकीटदरांमध्ये केलेल्या दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *