#HindusNotSafeInBangladesh हा ‘ट्विटर ट्रेंड’ भारतात चौथ्या स्थानी
मुंबई : आज बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू तेथे नरकयातना भोगत आहेत. हिंदूंवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड, हिंदु महिलांवर जिहाद्यांकडून बलात्कार, तसेच हिंदूंच्या अधिकारांसाठी लढा देणार्या हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमणे यांसारख्या अनेक संकटांनी बांगलादेशातील हिंदू ग्रस्त आहेत. या बिकट स्थितीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी १ नोव्हेंबर या दिवशी #HindusNotSafeInBangladesh हा विषय ट्विटर वर ‘ट्रेंड’ झाला. (ट्रेंड म्हणजे ट्विटरवरील अधिक चर्चित विषय)
विशेष म्हणजे हा ‘हॅशटॅग’ सकाळी साधारण ८.३० वाजल्यापासून भारतात प्रथम १० मध्ये ट्रेंड झाला होता. काही वेळातच हा ट्रेंड चौथ्या स्थानी पोचून बराच काळ त्या स्थानी कायम होता. या ट्रेंडमधे शेकडो धर्माभिमानी हिंदू आणि धर्मप्रेमी नागरिक यांनी सहभाग घेऊन बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविषयी त्यांचा रोष व्यक्त केला अन् भारत शासनाकडे त्यांच्या रक्षणाची मागणी केली.