आतंकवादी संघटनांशी संबंध असणार्यांना पाकने निवडणूक लढवण्याची अनुमती दिल्याचाही आरोप
पाकिस्तानचा जिहादी चेहरा आता पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे. आतंकवादाचे पोषण करणार्या पाकवर जागतिक स्तरावर बहिष्कार घालणे आवश्यक आहे. यासाठी भारतानेच पुढाकार घेऊन आर्थिक, सामाजिक, सामरिक आदी स्तरांवर पाकची कोंडी करून त्याचा खोटारडेपणा अन् कावेबाजपणा जगासमोर आणायला हवा !
वॉशिंग्टन – अमेरिकेने १ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार वर्ष २०१८ मध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी आतंकवादी संघटनांना मिळणार्या पैशांवर आणि या संघटनांमध्ये होणार्या जिहाद्यांच्या भरतीवर आळा घालण्यात पाकिस्तान अयशस्वी ठरला. यासमवेतच पाकने या संघटनांशी संबंध असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्याचीही अनुमती दिली, अशी माहिती अमेरिकेने वर्ष २०१८ च्या वार्षिक अहवालात प्रसिद्ध केली आहे. (यातून जिहादी आतंकवादीच पाकिस्तान चालवतात, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या अहवालात ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ या संघटनांवर संयुक्त राष्ट्रांचे प्रतिबंध लागू करण्यातही पाक सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या संघटना सातत्याने पैसा गोळा करत आहेत. भारत आणि अफगाणिस्तान या देशांवर जिहादी आक्रमणे करण्याची या दोन्ही संघटनांची स्वत:ची क्षमता तशीच राखून ठेवली आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, जागतिक स्तरावर इराण हे आतंकवादाला सर्वाधिक पोषक राष्ट्र असून ‘अल्-कायदा’ या संघटनेचे अस्तित्व अजूनही टिकून आहे. जागतिक स्तरावर ‘जिहादी आंदोलना’च्या रूपात स्वत:ला साकारण्याचा ‘अल्-कायदा’चा प्रयत्न आहे.
पूंछ सेक्टरमध्ये पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाक सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे केले जाणारे उल्लंघन हे भारताला चिथावणी दिल्यासारखेच आहे. याविषयी पाक सैन्याचे प्रवक्ते काही बोलणार नाहीत, उलट ते भारतीय सैनिकांवर खोटारडे आरोप करतील. त्यामुळे पाकच्या या चिथावणीला भारताने एकदाच सडेतोड प्रत्युत्तर देऊन त्याचा कायमचा बंदोबस्त करावा !
श्रीनगर – केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात वेगवेगळ्या कुरापती काढल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील पूंछमधील शाहपूर किरनी सेक्टरमध्ये २ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या वेळी पाक सैन्याने भारतीय सैनिकांवर गोळीबार केला. याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर देत त्यांच्यावरही गोळीबार केला.
काश्मीर खोर्यात लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना अटक
उत्तर काश्मीरच्या बारामुल्लाच्या विविध भागांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलीस आणि सैन्यदल यांच्या संयुक्त पथकाने अटक केली. या वेळी पथकाने बंदुका आणि ग्रेनेड अशा शस्त्रास्त्रांचा साठा कह्यात घेतला आहे.
कुलगाम येथे आतंकवाद्यांनी दोन नेत्यांची वाहने पेटवली
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम येथील बुनीगाम भागात आतंकवाद्यांनी १ नोव्हेंबरला भाजपचे जिल्हा महासचिव आदिल अहमद गणी यांच्यासह आणखी एका नेत्याचे खाजगी वाहन पेटवून दिले. या वेळी आतंकवाद्यांनी जिहादी घोषणा दिल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवलेला असून अधिक अन्वेषण चालू केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात