ठाणे : हिंदु महासभेचे नेते तसेच हिंदु समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे हिंदु समाजाची पुष्कळ हानी झाली आहे. त्यांचे हिंदु समाजाच्या प्रती योगदान प्रेरणादायी आहे. हिंदूंच्या नेत्यांची वेचून हत्या करण्यात येणे हे हिंदु समाजाला असुरक्षित करण्याचे षड्यंत्र आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे अपर जिल्हाधिकार्यांकडे नुकतीच करण्यात आली. याचा सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेधही व्यक्त करण्यात आला.
या वेळी केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे
१. या हत्येच्या मुळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि हिंदु समाजाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आश्वस्त करावे.
२. कमलेश तिवारी यांच्या सुरक्षेमध्ये निष्काळजीपणा करणार्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.
३. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुख नेत्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ : विश्व हिंदु परिषदेचे ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल देव, श्री. ओंकार चांगण, हिंदु महासभेचे श्री. विवेक घारगे, श्री. अमोल देसाई, वन्दे मातरम् प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रॉकी हिंदुस्थानी, विहिंप-बजरंग दलाचे श्री. राकेश सरोज, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. कैलाश जाधव, श्री. आदित्य देशमुख, श्री. आशिष पांडे, श्री. अमित गुजर, श्री. प्रकाश सावंत, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. प्रमोद उतेकर, श्री. निखिल सूर्यवंशी, शिवस्वराज्य संघाचे अधिवक्ता श्री. रणधीर सकपाळ, श्री. सुधीर सकपाळ