Menu Close

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती जपण्याचे मोठे कार्य करत आहेत !’

डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी, भाजपा खासदार यांना ‘सनातन पंचांग’ भेट

डावीकडे डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी यांना सनातन पंचांग भेट देतांना श्री. राजन बुणगे

सोलापूर : येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी सदिच्छा भेट घेऊन ‘सनातन पंचांग’ भेट दिले. या वेळी डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामीजी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक करतांना म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हे शांतपणे समाजामध्ये हिंदु संस्कृती जपण्याचे आणि ती वाढवण्याचे मोठे कार्य निष्ठेने करत आहे. मी अनेक वर्षांपासून सनातन संस्थेला ओळखतो, तुमचे कार्य चांगले आहे.’’

या प्रसंगी येथील प्रसिद्ध उद्योजक आणि ‘नाकोडा ग्रुप’चे श्री. बाबुभाई मेहता, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे हेही उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *