Menu Close

त्रिपुरामध्ये ख्रिस्ती धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्याची छळ करून हत्या !

शाळेचे पाद्री आणि ख्रिस्ती असलेले वसतीगृह अधीक्षक यांना अटक

  • ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी किती खालच्या थराला जात आहेत, याचेच हे उदाहरण ! हिंदूंच्या धर्मग्रंथांवर चिखलफेक करणे, हिंदूंचा बुद्धीभेद करणे, त्यांची फसवणूक करणे, अशा नेहमीच्याच साधनांसमवेत आता कोणी धर्मांतरास नकार दिला, तर त्याला ठार मारण्यापर्यंत यांची मजल गेली आहे, हे लक्षात घ्या. यावर हिंदूसंघटन आणि धर्मशिक्षण हाच एकमेव उपाय आहे !
  • हिंदू हे देहलीतील विविध चर्चवर आक्रमण करत असल्याचा कांगावा करून त्यांना असहिष्णू ठरवणारे धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि पुरोगामी आता गप्प का ? हिंदूंनी धर्मांतरास विरोध केल्याने त्यांच्या होणार्‍या हत्या, ही ‘सहिष्णुता’ आहे का ?

आगरतळा (त्रिपुरा) : येथील कुमारघाट क्षेत्रात असलेल्या पाबियाछरा येथे चालवण्यात येणार्‍या ‘होली क्रॉस’ शाळेतील हॅपी देववर्मा नावाच्या नववीच्या विद्यार्थ्याची नुकतीच हत्या करण्यात आली. शाळेच्या वसतीगृहातील ‘बुलचुंग हलम’ नावाच्या अधीक्षकाने वारंवार छळ केल्याच्या आरोपावरून देववर्माचा जीबीपी रुग्णालयात मृत्यू झाला. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली आहे.

‘यूएन्आय’ वृत्तसंस्था आणि ‘नॉर्थ इस्ट नाओ’ हे इंग्रजी वृत्तसंकेतस्थळ यांनी दिलेल्या वृत्तानुसार १५ वर्षांच्या देववर्माच्या मृत्यूची त्रिपुरा सरकार न्यायालयीन चौकशी करत आहे. बुलचुंग हलम या वसतीगृह अधीक्षकांनी देववर्मावर पाशवी आक्रमण केल्यामुळे त्याला अंतर्गत जखमा झाल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असा हलम यांच्यावर आरोप आहे. अधीक्षकाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बुलचुंग हलम हे देववर्मावर विनाकारण अत्याचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, देववर्मा याने हलम करत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या धर्मांतराच्या प्रयत्नांना विरोध केला होता. जेव्हा हलम यांनी देववर्मा याचेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने बंड केले. याचा सूड उगवण्यासाठी २५ सप्टेंबर २०१९ च्या दुपारी हलम यांनी देववर्माला वसतीगृहाबाहेरील एका निर्जन ठिकाणी बोलावले आणि त्याच्या छातीवर जोरदार प्रहार केला. देववर्मा खाली कोसळताच हलम यांनी त्याच्यावर उभे राहून क्रूरपणे प्रहार केले. देववर्माला रुग्णालयात भरती करण्यात आले. शेवटी २० ऑक्टोबर या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

पीडित मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ‘होली क्रॉस’ शाळेचे पाद्री लेन्सी डिसोझा आणि मुख्य आरोपी बुलचुंग हलम यांना अटक केली आहे. हलम आणि पाद्री डिसोझा यांचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याविषयी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *