जळगाव येथील धर्मप्रेमींचा स्तुत्य उपक्रम !
जळगाव : येथील गेंदालाल मिल परिसरातील छत्रपती शिवाजी राजे ग्रुपच्या धर्मप्रेमी युवकांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजू तांबट यांचा ‘फेसबूक’वर पोस्ट केलेला धर्मजागृतीपर लेख वाचला. त्यात म्हटले आहे की, दीपावलीच्या कालावधीत श्री लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची घरोघरी मनोभावे पूजाअर्चा केली जाते; पण अनेक जण पूजेनंतर या मूर्तींचे विधीवत विसर्जन करत नाहीत. अशा मूर्ती मंदिरांत आणि रस्त्यांवर आणून टाकल्या जातात. यातून देवतांचे विडंबन होते. त्यामुळे ‘हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूच’, असे म्हणण्याची वेळ येते.
उपरोक्त माहिती वाचून धर्मप्रेमींनी अशा मूर्ती संकलित करून त्यांचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विधीवत विसर्जन करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी आतापर्यंत १४० मूर्ती संकलित करून विसर्जित केल्या.
या वेळी सर्वश्री शिव लेडवे, भैया कोळी, गणेश लोखंडे, ललित दुधाने, विशाल बाविस्कर, अवि सपकाळे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते. ‘ही सेवा केल्यावर पुष्कळ आनंद मिळाला. श्री लक्ष्मीची खरी कृपा झाली’, असे मत सर्वांनी व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात