हिंदूंच्या प्रथा-परंपरांवर अशी बंदी घालणे, हे हिंदूंना धर्मपालन करण्यास आडकाठी करण्यासारखे आहे !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : कार्तिकी यात्रेच्या काळात १२ नोव्हेंबरपर्यंत भाविकांना नामदेव पायरी आणि परिसरात नारळ वाढवण्यास बंदी घातली आहे. नारळाच्या करवंट्यांमुळे या भागात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी पंढरपूर येथील उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ अन्वये मंदिर परिसरात नारळ विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ वाढवण्यास बंदीचा आदेश दिला आहे. (नारळ वाढवणे ही हिंदूंच्या धर्मशास्त्रातील एक मंगलमय कृती आहे. धर्मशास्त्र जाणून न घेते दुर्घटनेच्या नावाखाली या कृतीवर बंदी घालणे हा, एकप्रकारे घालाच घातला जात आहे. दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने बंदी घालण्यऐवजी धर्मपालन करण्यास सोयीचे होईल, अशी उपाययोजना काढणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात