शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयावर ठाम
मुंबई : शिवसेनेची निर्मिती स्वाभिमानातून झाली आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळे करत नाही. जे ठरले तसे असेल, तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दूरभाष करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण अधिक नको. मला स्वत:ला युती तोडायची नाही. भाजपने निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले. या विधानातून श्री. ठाकरे यांनी ‘शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयावर ठाम आहे’, हेच अप्रत्यक्षपणे घोषित केले. ७ नोव्हेंबर या दिवशी श्री. ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’ येथे शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत श्री. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका सांगितली. या बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार वांद्रे येथील हॉटेल रंगशारदा येथे रवाना झाले. शिवसेनेचे सर्व आमदार फोडाफोडीचे राजकारण होण्याच्या भीतीने हॉटेल रंगशारदामध्ये थांबल्याचे म्हटले जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात