न्यायाधिशांची सुरक्षा वाढवावी लागणे, हे दुर्दैवी !
आमची न्यायदेवतेवर श्रद्धा होती. हिंदु समाजाच्या अनेक पिढ्या शेकडो वर्षे ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या, त्या श्रीरामजन्मभूमीला आज न्याय मिळाला आहे. प्रभू श्रीरामांनीच आम्हाला हा न्याय मिळवून दिला आहे, अशी आमची भावना आहे. या निकालाचे श्रेय मंदिरासाठी अखंड लढा चालू ठेवणारे हिंदु पूर्वज, बलिदान करणारे साधू-संत, कारसेवक आणि न्यायालयात मंदिराची योग्य बाजू मांडणारे अधिवक्ता यांनाही दिले पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचेही आम्ही वेळेत निकाल दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो, त्याच वेळी दुर्दैव वाटते की, देशात सर्व जण शांततेचे आवाहन करत असताना निकाल देणार्या न्यायाधिशांची सुरक्षा वाढवावी लागत आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येमध्ये मोक्याच्या जागी ५ एकर भूमी देण्याचा दिलेला निर्णय हा प्रथमदर्शनी अनाकलनीय वाटला, तरी आज मिळालेला आनंद यापेक्षा कैकपटीने आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आमची न्यायालयावर श्रद्धा आहे की, यापुढे काशी आणि मथुरा यांसारख्या अन्य मंदिरांच्या प्रकरणीही लवकरच आम्हाला न्याय मिळेल, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.