-
भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे शेकडो वर्षांची परंपरा होणार खंडीत !
-
ग्रामस्थांचा बंदीला कडाडून विरोध
सोनई (नगर) : शनिशिंगणापूरच्या शनि मंदिराच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा यासाठी भूमाता बिग्रेडने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रथापंरपरेनुसार प्रवरासंगम आणि काशी येथून आणण्यात येणारे पवित्र गंगाजल चौथर्यावर जाऊन अर्पण करण्यास बंदी घालण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.
आणलेले गंगाजल पायरीजवळ जलपात्रात साठवून ते पाईपद्वारे मूर्तीवर टाकण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कावडयात्रेकरूंमध्ये नाराजी पसरली असून यामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे. गंगाजल अर्पण करण्यास बंदी घातल्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली पंरपरा बंद करता येणार नाही, असे ठणकावून सांगून चौथर्यावर गंगाजल अर्पण करण्यात येणार असल्याचे गावकर्यांनी सांगितले. या वेळी विश्वस्त मंडळ, सरपंच बाळासाहेब बानकर, बाळासाहेब बोरुडे, बापूसाहेब शेटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात