Menu Close

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; राममंदिरासाठी सोन्याची वीट देणार ! – बाबरचे वंशज

रामजन्मभूमीच्या निकालाला विरोध करणार्‍यांना चपराकच !

नवी देहली : रामजन्मभूमी निकालामुळे बाबरच्या नावाची अपकीर्ती करणार्‍यांना एक धडा शिकवला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक आणि स्वागतार्ह असून तो आपण सर्वांनी मनापासून स्वीकारला पाहिजे. अयोध्या प्रभु श्रीराम यांचे जन्मस्थान आहे. तेथे एक भव्य मंदिर असलेच पाहिजे. आम्ही मंदिरासाठी सोन्याची वीट देणार आहोत. आपण सर्वांनी मिळून राममंदिर बनवावे, म्हणजे आपल्या देशात आणि लोकांमध्ये किती सामंजस्य आहे, हेही सर्वांना कळेल, असे प्रतिपादन हुमायून बाबरचे वंशज आणि मोगल बादशहा बहादूर शाह जफरचा नातू याकूब हबीबुद्दीन उपाख्य प्रिन्स तुसी यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर या दिवशी रामजन्मभूमी खटल्याचा निकाल दिला. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *