Menu Close

महालक्ष्मी मंदिर प्रवेशप्रश्‍नी बैठकीनंतर निर्णय घेऊ : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरप्रवेशाविषयी न्यायालयाने राज्यशासनाला दिलेल्या निर्देशाची माहिती घेऊन दोन दिवसांत या संदर्भात श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ यांच्याशी बैठक घेऊ. त्यानंतर मंदिर प्रवेश अंमलबजावणीविषयी चर्चा करू, असे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सांगितले आहे.

१. अंबाबाई देवस्थान सर्वसामान्य भक्त महिला कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सैनी यांची ५ एप्रिलला भेट घेतली.

२. न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी प्रतिकात्मक पूजा करण्याविषयीची पूर्वकल्पना देऊनही महिला भक्तांना फूस लावून आंदोलनास भाग पाडल्याचा आरोप शिष्टमंडळातील महिलांनी केला.

३. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणार्‍या आणि बघ्याची भूमिका घेणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करावी. धक्काबुक्की करणार्‍या महिलांविरुद्ध तक्रार नोंद करून कारवाई करावी, अशी मागणी या वेळी सैनी यांच्याकडे करण्यात आली.

४. अंबाबाई विष्णुपत्नी असल्याचे चुकीचे मत बिंबवणार्‍या श्रीपूजकांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर पूजा करण्यास बंदी घालावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

५. सैनी म्हणाले की, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा अध्यक्ष असल्याने मंदिर प्रवेश उपक्रमाची कल्पना मला देण्याची आवश्यकता होती. मंदिरात गोंधळ चालू झाल्यावर मला माहिती देण्यात आली. मंदिरात महिलांना कुणी रोखले याविषयी माहिती घेतली जाईल.

मंदिराच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचारी असतांना पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या महिला सुरक्षारक्षक आणि कर्मचारी तिथे का उपस्थित होत्या, याची चौकशी केली जाईल. न्यायालयाच्या निर्णयाविषयी राज्यशासनाकडून माहिती घेऊन दोन दिवसांत श्रीपूजक, पोलीस प्रशासन, पश्‍चिम देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली जाईल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *