कोलकाता (बंगाल) : सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर युवकांनी राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी करणे आवश्यक आहे. मीसुद्धा या कार्यासाठी सामजिक प्रसारमाध्यमांचा वापर अधिकाधिक करीन, असे प्रतिपादन ‘ट्रूथ’ या नियतकालिकाचे संपादक आणि कोलकाता (बंगाल) येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्र धर्म प्रचार सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ‘सामाजिक प्रसारमाध्यम (सोशल मीडिया) कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पू. (डॉ.) सेन बोलत होते.
या कार्यशाळेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश तांबे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करतांना ‘आजच्या युगात सामाजिक प्रसारमाध्यमांचे महत्त्व काय आहे ?’, ‘हिंदु जनजागृती समिती सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कसे कार्य करत आहे ?’ याविषयी माहिती दिली. समितीचे श्री. सुमंतो देबनाथ यांनी ‘ट्विटर’विषयी तांत्रिक आणि त्याचा वापर कसा करावा ? याविषयी माहिती दिली. समितीचे श्री. शंभु गवारे यांनी ‘सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर करतांना कोणती सूत्रे लक्षात घ्यायला हवी ?’ याची माहिती दिली. या कार्यशाळेचे आयोजन शास्त्र धर्म प्रचारसभेचे डॉ. कौशिकचंद्र मल्लिक आणि श्री. शोभन सेनगुप्ता यांनी केले.
क्षणचित्रे
१. या कार्यशाळेत सर्वांचा सहभाग उत्साहवर्धक होता.
२. पुढील मासात अशीच आणखी एक कार्यशाळा घेऊन त्यात पुढील माहिती शिकू, असे कार्यशाळेत उपस्थित सर्वांनी सांगितले.