आतापर्यंत भारतात होणार्या आतंकवादी कारवायांच्या मागे पाक आहे, हा भारताचा दावा पाक सातत्याने फेटाळत होता; मात्र आता स्वतः पाक सैन्याचे माजी सैन्यप्रमुखच हे मान्य करत आहेत, यातून पाकचा खरा तोंडवळा जगासमोर उघड झाला आहे !
नवी देहली : पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी काश्मीरमधील लोकांना सैनिकी प्रशिक्षण दिले. त्यानंतर भारतीय सैन्यावर आक्रमण करणारी लष्कर-ए-तोयबासारखी आतंकवादी संघटना उदयास आली, अशी स्वीकृती पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि माजी सैन्यदलप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिली आहे. त्यांनी दिलेली मुलाखत सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहे. त्यात त्यांनी वरील विधान केले आहे. ‘ओसामा बिन लादेन आणि जलालुद्दीन हक्कानी हे पाकिस्तानसाठी नायक (हिरो) होते’, असेही त्यांनी या मुलाखतीत मान्य केले. (पाकचे माजी राष्ट्रप्रमुख कट्टर आतंकवाद्यांना ‘नायक’ संबोधतात. हे लक्षात घेऊन पाकला ‘आतंकवादी राष्ट्र’ घोषित करण्यासाठी जगाने पावले उचलणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या मुलाखतीत मुशर्रफ यांनी पुढे म्हटले की, वर्ष १९७९ मध्ये सोव्हिएत युनियनला (आताच्या रशियाला) अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासह पाकला लाभ होण्यासाठी आम्ही ‘धार्मिक सैन्या’च्या निर्मितीस प्रारंभ केला. आम्ही जगभरात मुजाहिदीन अर्थात जिहादी शोधले. त्यांना प्रशिक्षण दिले. शस्त्रास्त्रे दिली. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. आमचे नायक आता खलनायक झाले आहेत. जे काश्मिरी पाकमध्ये येत होते, त्यांचे स्वागत नायकासारखे केले जात होते. धर्मयोद्धे म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे बघायचो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात