Menu Close

श्री तुळजाभवानी देवस्थानाची २६५ एकर भूमी हडपणार्‍या दोषींवर कारवाई करा : आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

  • आदेश निर्गमित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आमदार गोगावले यांना आश्‍वासन !

  • शिवसेनेच्या आमदारांचे विधानभवनात आंदोलन !

भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

shivsena
डावीकडून शिवसेनेचे आमदार सर्वश्री उल्हास पाटील, सदानंद चव्हाण, तुकाराम काते, भरतशेठ गोगावले, राजेश क्षीरसागर, रूपेश म्हात्रे, अमित घोडा आणि प्रकाश आबिटकर

मुंबई : सहस्रावधी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या दोन्ही काँग्रेसने राज्यातील देवस्थानांनाही सोडलेले नाही. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानाची जवळपास २६५ एकर जमीन तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे. मंदिरातील दानपेटीतील लिलावात भ्रष्टाचार करून अंदाजे शेकडो कोटी रुपयांहून अधिक संपत्तीची लूट केलेली आहे; म्हणूनच आघाडी शासनावर देवीचा कोप होऊन शासनाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे महाड येथील आमदार भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना केला. त्याचबरोबर या विषयाची लक्षवेधी मांडल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी शिवसेनेचे आमदार सर्वश्री उल्हास पाटील, सदानंद चव्हाण, तुकाराम काते, राजेश क्षीरसागर, रूपेश म्हात्रे, अमित घोडा आणि प्रकाश आबिटकर उपस्थित होते. या आंदोलनाच्या वेळी गृहनिर्माण आणि कामगार मंत्री श्री. प्रकाश मेहता यांनी भेट दिली.

या प्रकरणी सहा वर्षे झाली, तरी गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी रखडवून ठेवण्यात आलेली आहे. कोणावरही कारवाई झालेली नाही. या घोटाळ्याचे अहवालच दडपले जात आहेत. शासनाने याप्रकरणी सर्व दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा राज्यात प्रखर आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी ५ एप्रिलला आंदोलनाद्वारे शासनाला दिली. आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आमदार गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मला माहीत आहे. याविषयी मी आदेश निर्गमित करतो, असे आश्‍वासन आमदार गोगावले यांना दिले.

असा झाला भ्रष्टाचार !

१. श्री तुळजापूर देवस्थानच्या मालकीची ३ सहस्र ५६८ एकर भूमी आहे. त्यांपैकी अमृतवाडी येथील २६५ एकर भूमी २० जुलै २००८ या दिवशी अनधिकृतरित्या फेरफार करून ती ७७ लोकांच्या नावावर करण्यात आल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी उघडकीस आणले.

२. याचा विधी आणि न्याय खात्याने बनवलेला चौकशी अहवाल नंतर महसूल खात्याने दडपून टाकला आहे. हे केवळ शेकडो एकर भूमी घोटाळ्याचे प्रकरण नसून तुळजापूर देवस्थानच्या दानपेट्यांच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे धर्मदाय सहआयुक्तांच्या चौकशीत उघड झाले आहे.

३. दानपेटीत भाविक रोख रक्कम, सोने-चांदी यांचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू देवीला अर्पण करतात. या दानपेट्यांचा दरवर्षी लिलाव करण्यात येत असे. त्यानुसार वर्ष १९९१ ते २००९ अर्थात १९ वर्षांत दानपेटीत केवळ ०.८ ग्रॅम सोने आणि २५ ग्रॅम चांदी मिळाली.

४. प्रत्यक्षात चौकशीत उघड झाले की, १९ मार्च २०१० ते १९ एप्रिल २०१० या काळात म्हणजेच केवळ एक महिन्यात ४४१ ग्रॅम सोने आणि ६.१७१ किलो चांदी दानपेटीत जमा झाली होती. याचाच अर्थ १९ वर्षांत प्रचंड प्रमाणात सोने आणि चांदी जमा झालेली असणार. यात नवरात्रीत आणि उत्सव काळात देवीला मोठे अर्पण मिळते.

५. वर्ष २०१० मध्ये शासनाच्या लक्षात आले की, देवस्थानचे एका वर्षाचे सरासरी उत्पन्न साधारण ४ कोटी ६३ लाख रुपये आहे; परंतु दानपेटीचा लिलाव केवळ २ कोटी ६७ लाख रुपयांना करण्यात आला होता. म्हणजे वर्षाला २ कोटी रुपयांचा तोटा देवस्थानला झाला आहे. अशा प्रकारे १९९१ पासून दरवर्षी देवस्थानचे कोट्यवधी रुपये लुटले गेले आहेत.

धर्मावरील आघातांच्या विरोधात विधानसभवनाच्या परिसरात आंदोलन करणार्‍या शिवसेना आणि भाजपच्या धर्माभिमानी आमदारांचे अभिनंदन !

१. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ अनधिकृतपणे बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे कृत्य पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले. हे अनधिकृत शौचालय पाडून टाकण्याची मागणी करत शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी ५ एप्रिल या दिवशी विधानभवनाच्या बाहेर आंदोलन केले.

२. या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करावेत, तसेच शासनाने १५ एप्रिल २०१६ पर्यंत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणचे अनधिकृत शौचालय स्वतःहून पाडून टाकावे अन्यथा शिवसैनिक आपल्या पद्धतीने करसेवा करून ते शौचालय पाडतील, अशी चेतावणी दिली.

३. या वेळी शिवसेनेचे आमदार सर्वश्री राजेश क्षीरसागर, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, सत्यजित पाटील, भरतशेठ गोगावले, तसेच भाजपचे आमदार सर्वश्री नरेंद्र पवार, प्रशांत ठाकूर, शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते.

४. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानाची जवळपास २६५ एकर भूमी हडपण्याच्या विरोधात ६ मार्च या दिवशी शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *