Menu Close

माद्रिद (स्पेन) येथील ऑनलाईन विक्रेत्याकडून श्री गणेश लेगिंग्जची विक्री

संतप्त हिंदूंकडून लेगिंग्जची विक्री मागे घेण्याचे आवाहन

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

नेवाडा (अमेरिका) : माद्रिद (स्पेन) येथील ऑनलाइन किरकोळ विक्रेता मुंडोबुडा आस्थापनाने हिंदु देवता श्री गणेशाची प्रतिमा असणारी योग लेगिंग्ज विक्रीस ठेवून देवतेचे विडंबन केले आहे. हिंदु धार्मिक नेते राजन झेद यांनी मुंडोबुडा आस्थापनाने श्री गणेश योग लेगिंग्ज मागे घेण्यासमवेतच औपचारिक क्षमायाचना करावी, अशी मागणीही त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली. (विदेशातील हिंदु देवतांचा अवमान झाल्यावर त्याचा तात्काळ विरोध करतात; मात्र भारतातील हिंदूंना ‘असा अवमान असतो’, हेही समजत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *