Menu Close

पाक स्वत:च मानवाधिकारांची पायमल्ली करत आहे ! – भारत

‘यूनेस्को’मध्ये पाकने अयोध्येच्या निकालाचे सूत्र उपस्थित करताच भारताने सुनावले खडेबोल

भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसणारा पाक ! येनकेन प्रकारेण भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती करणारा कावेबाज पाक ! सरकारने आता पाकला समजेल अशा भाषेत उत्तर द्यावे ! पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविषयीही आता भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने आवाज उठवायला हवा !

पॅरीस : भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर पाकिस्तान भारताच्या विरोधात सतत खोटा प्रचार करत आहेे; पण त्यात त्याला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. प्रत्येक वेळी भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावरून बिथरलेल्या पाकिस्तानने ‘यूनेस्को’मध्ये काश्मीर आणि अयोध्या प्रकरणांवर भाष्य करून भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात नाक खुपसले. त्यावर भारताने पाकला ‘ही आमच्या राष्ट्रातील अंतर्गत बाब आहे. यात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. तुमच्या ‘डीएन्ए’मध्ये आतंकवाद आहे’, असे खडेबोल सुनावले.

या वेळी भारताच्या प्रतिनिधी अनन्या अग्रवाल यांनी पाकच्या कुकृत्यांचा पाढाच वाचला. अनन्या अग्रवाल यांनी पाकला खडेबोल सुनावतांना सांगितले की,

१. पाक भारताची अखंडता मोडित काढत आहे. पाक आमच्या अंतर्गत प्रकरणांत दखल देण्याचा प्रयत्न करत आहे; पण स्वत:च्या देशात मात्र मानवाधिकारांची पायमल्ली करत आहे. तेथे अल्पसंख्याकांवर अत्याचार चालू आहेत.

२. आमच्या शेजारील राष्ट्राला दुसर्‍याच्या घरात बघण्याची सवय लागली आहे. स्वत:च्या घरातील कारस्थाने लपवण्यासाठी भारताच्या अंतर्गत प्रकरणांवर खोटे दावे करत आहे; मात्र त्यांचा देश आतंकवाद्यांनी पोखरला आहे.

३. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानात २३ टक्के अल्पसंख्याक समाज होता. ती संख्या घटून आता ३ टक्क्यांवर आली आहे. तेथे शीख आणि हिंदू यांच्या विरोधात कायदे बनवून त्यांना बळजोरीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे.

४. पाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ हे ओसामा बिन लादेन आणि अन्य आतंकवाद्यांना पाकिस्तानचे नायक मानतात.

५. पाकिस्तान हा अपयशी देश असून तेथे आतंकवाद्यांनी पाय रोवले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *