Menu Close

(म्हणे) ‘मला माझी मशीद परत हवी !’ – ओवैसी

‘आम्हाला आमची साडेचार लाख मंदिरे परत हवी आहेत’ अशी मागणी हिंदू गेली अनेक शतके करत आहेत ! याविषयी ओवैसी बोलतील का ?

भाग्यनगर : ‘मला माझी मशीद परत हवी’, असे ट्वीट एम्.आय.एम्.चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रामजन्मभूमी खटल्याच्या निकालानंतर केले. त्यांच्या या ट्वीटवरून सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेकांनी ओवैसी यांना सुनावतांना म्हटले, ‘ओवैसी यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही ?’, तर काही जणांनी ‘ओवैसी यांनी देश सोडला पाहिजे’, असे ट्वीट केले आहे. त्यास अनेकांनी सहमती दर्शवली आहे. काही जणांनी ‘ओवैसी यांना थेट १६ व्या शतकात जा; कारण आताचा भारत हा मोगलाईच्या काळातील भारत नाही’, असेही खडे बोल सुनावले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *