विहिंपच्या नावाखाली धन गोळा करणार्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
नवी देहली : अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारे धन गोळा करणे चालू नाही, असे स्पष्टीकरण विश्व हिंदु परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे.
Press statement:
No fund is being collected for Shri Ram Janmbhumi temple: VHP pic.twitter.com/zcQqCcL6iM— Vishva Hindu Parishad -VHP (@VHPDigital) November 17, 2019
१. विहिंपचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी यात म्हटले आहे की, विहिंपने ‘श्रीरामजन्मभूमी न्यासा’च्या अंतर्गत वर्ष १९८९ नंतर कधीही सार्वजनिकरित्या धन गोळा केलेले नाही आणि करण्याचे आवाहनही केले नाही.
२. विहिंपचे प्रवक्ते विनोद बंसल यांच्या म्हणण्यानुसार विहिंपच्या नावावर अवैधरित्या राममंदिरासाठी धन गोळा केले जात आहे. या पार्श्वभूमीवर विहिंपने लोकांना सावध आणि सतर्क होण्यासाठी वरील प्रकारे स्पष्टीकरण दिले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात