न्यूयॉर्क टाइम्सने प्रसारित केलेल्या गोपनीय कागदपत्रांमधून माहिती उघड !
भारतातही कट्टर धर्मांध देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. चीन ज्या प्रकारे जागतिक दबावाची भीती न बाळगता धर्मांधांवर आळा घालतो, त्यातून भारत काही शिकणार का, हे कळीचे सूत्र आहे !
न्यूयॉर्क : चीन तेथील उघूर वंशीय मुसलमानांवर अत्याचार करत असल्याचे म्हटले जात असतांना ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या दैनिकाने या संदर्भातील काही गोपनीय कागदपत्रे उघड केली आहेत. यात वर्ष २०१४ मध्ये उघूर मुसलमानांच्या आतंकवादी संघटनेने एका रेल्वे स्थानकावर ३१ लोकांची हत्या केल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘फुटीरतावादी आणि कट्टरतावादी यांना जराही दया दाखवू नका’ असा आदेश दिल्याचे म्हटले आहे.
१. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाची ४०३ पानांची गोपनीय कागदपत्रे न्यूयॉर्क टाइम्सच्या हाती लागली आहेत. या दैनिकाच्या मते ही कागदपत्रे चीनच्या राजव्यवस्थेशी संबंधित एका व्यक्तीने त्याला दिली आहेत.
२. न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार ही कागदपत्रे उघडकीस आल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर, तसेच अमेरिकेने चीनवर टीका केली आहे; मात्र या संदर्भात चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
३. चीनने १० लाख उघूर मुसलमानांना एका पुनर्वसन केंद्रामध्ये डांबून ठेवले आहे आणि तेथे त्यांच्यावर राष्ट्रवादी विचाराचे संस्कार करण्यात येत आहेत. (भारतात अशा प्रकारे राष्ट्रवादी संस्कार केले जात नसल्याचे सर्वत्र राष्ट्रघातकी विचारांचे प्राबल्य वाढले आहे. त्यावर मात करण्यासाठी कठोर भूमिका घेऊन त्याची कार्यवाही आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात