हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा असा हीन पातळीला जाऊन अनादर करणार्यांची खासदारकी रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
चिदंबरम् (तमिळनाडू) : जर इमारतीला घुमट असेल, तर ती मशीद आहे. जर ती इमारत लांब आणि सरळ आहे, तर ते एक चर्च आहे अन् जर या इमारतीमध्ये घाणेरड्या मूर्ती असतील, तर ते मंदिर आहे, असे विखारी विधान येथील विदुथलाई चिरुथाइगल कत्छी (व्ही.व्ही.के.) पक्षाचे खासदार थोल थिरुमावलवन् यांनी १३ नोव्हेंबर या दिवशी केल्याचे समोर आले आहे. याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. थिरुमावलवन् हे सनातन धर्मशिक्षण धोरणांच्या विरोधातील बैठकीमध्ये बोलत होते. थिरुमावलवन् व्ही.व्ही.के. पक्षाचे संस्थापक आहेत. हा पक्ष अनुसूचित जातींच्या अधिकारांसाठी कार्य करतो, असा पक्षाचा दावा आहे.
१. हिंदु मुन्नानी या संघटनेने अरियालुर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये थिरुमावलवन् यांच्या विरोधात या विधानावरून तक्रार केली आहे (हिंदूंना अशी तक्रार करावी लागते; मात्र अन्य धर्मियांच्या विरोधात कोणी बोलले असते, तर पोलिसांनी थेट कारवाई केली असती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात); मात्र अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. (तमिळनाडूतील हिंदुद्वेषी पोलीस ! असा अवमान अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा कोणी केला असता, तर त्यांच्या अनुयायांनी पोलीस तक्रार करण्याच्या भानगडीत न पडता थेट कायदा हातात घेतला असता, हे पोलिसांना ठाऊक नाही का ? आता हिंदूंनी असे केले, तर पोलीस कारवाई करणार आहेत, असे समजायचे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. थिरुमावलवन् यांनी यापूर्वीही हिंदु धर्माच्या विरोधात विधाने केली आहेत आणि नंतर टीका झाल्यावर त्यांनी क्षमाही मागितली आहे. आताही ते असेच करतील, असे म्हटले जात आहे. सातत्याने अशी कृती करणार्या थिरुमावलवन् यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
३. काही मासांपूर्वी हिंदु मक्कल कत्छीचे संस्थापक अर्जुन संपथ यांनी केवळ तिरुवल्लूवर (तमिळनाडूतील प्राचीन विचारवंत) यांच्या मूर्तीला भगवा फेटा बांधून गळ्यात रुद्राक्षाची माळा घातल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती. (पोलिसांची कार्यतत्परता केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि त्यांचे नेते यांच्यावर कारवाई करतांनाच नेहमी दिसून येते, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात