Menu Close

गुढीपाडव्याला गंगाजलाभिषेक शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊनच करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार !

नगर : गुढीपाडव्याला करण्यात येणारा गंगाजलाभिषेक शनि देवाच्या चौथर्‍याखालून करावा, असा विश्‍वस्त मंडळाचा प्रस्ताव ग्रामस्थांनी अमान्य केला आहे. रूढीपरंपरेनुसार चौथर्‍यावर जाऊनच अभिषेक करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

१. गुढीपाडव्याला या ठिकाणी गंगा आणि गोदावरी या नद्यांचे पाणी कावडीने आणून श्री शनिदेवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे.

२. तालुक्यातील प्रत्येक गावातून युवक कावडीने पाणी घेऊन येतात. रात्री २ वाजल्यापासून चालू होणारा हा अभिषेक सकाळी ९ वाजेपर्यंत चालतो. या काळात सहस्रावधी युवक चौथर्‍यावर जाऊन मूर्तीवर पाणी घालतात आणि दर्शन घेतात.

३. चौथर्‍यावर पुरुषांना जाण्यास मागील ३ मासांपासून बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर येथे महिला आणि पुरुष दोघेही चौथर्‍याखालून दर्शन घेत असून त्यांना समान दर्जा मिळत असल्याचे देवस्थानच्या विश्‍वस्तांचे मत आहे.

४. गुढीपाडव्याला पुरुषांना चौथर्‍यावर सोडले, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये गुढीपाडव्याला चौथर्‍यावर प्रवेश दिला जाणार नाही, या निर्णयावर देवस्थान न्यास ठाम आहे; मात्र ग्रामस्थ आणि देवस्थान बचाव कृती समितीने यास विरोध केला आहे.

५. गेल्या २ दिवसांपासून प्रशासनाच्या साहाय्याने यासाठी बैठका घेण्यात येत आहेत; मात्र यातून काहीही तोडगा निघालेला नाही.

६. देवस्थान बचाव कृती समितीचे संभाजीराव दहातोंडे म्हणाले की, गुढीपाडव्याची ही परंपरा पुष्कळ जुनी आहे. देवस्थानच्या घटनेत याचा उल्लेख आहे, तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशातही याविषयी काहीही म्हटलेले नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे युवक चौथर्‍यावर जाऊनच अभिषेक करणार आहेत. त्याला कुणी विरोध करू नये.

७. गुढीपाडव्याच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी विश्‍वस्तांनी पोलिसांकडे साहाय्य मागितले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *