बांगलादेशामध्ये असुरक्षित हिंदू आणि त्यांची मंदिरे !
ढाका (बांगलादेश) : बांगलादेशातील तंगाईल कालीहाटी भागातील काली मंदिरातील मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करून मंदिराचे पावित्र्य भ्रष्ट करण्याची घटना १४ नोव्हेंबरला घडली. मंदिरात असलेल्या ५ मूर्तींपैकी महादेव, जुगिनी आणि शितोला या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तर काली अन् डाकीनी या देवतांच्या मूर्ती पाडण्यात आल्या. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अहादुझ्झमन, कालीहाटी उपजिल्हा परिषदेचे अध्यक्ष अन्सार अली, पोलीस उपनिरीक्षक रासेल मोनीर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि उपजिल्हा पूजा समितीचे अध्यक्ष शुदीप कुमार दत्त यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या उपजिल्ह्यातील सिलीमपूर येथील काली मंदिरातील ५ मूर्तींची गेल्या आठवड्यात तोडफोड करण्यात आली होती.
१. काली मंदिराचे अध्यक्ष प्रतीश चंद्र यांनी याविषयी कालीहाटी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. कालीहाटी पोलीस ठाण्याचे प्रमुख हसन अल मामून म्हणाले, ‘‘अशा प्रकारे मूर्तीभंजन करण्याचा प्रयत्न एक गट करत आहे, असा आम्हाला संशय आहे. लवकरात लवकर आम्ही त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करू.’’
२. उपजिल्हा पूजा उडजापन परिषदेचे मुख्य सचिव गोबिंदा चंद्र सहा म्हणाले, ‘‘एक धर्मद्वेषी गट येथील सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. या उपजिल्ह्यात अशा शेकडो मूर्ती आहेत. याविषयी शासनाने कायदेशीर कारवाई केली पाहिजे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात