शत्रूराष्ट्र पाकिस्तानसोबत शांतता आणि मैत्रीची दिवास्वप्ने पाहणारे भारतीय राज्यकर्ते झोपेतून जागे होतील तो सुदिन ! – संपादक, हिंदुजागृती
नवी देहली : भारतासोबत सुरू असलेली शांतता चर्चा पाकिस्तानने स्थगित केल्याची माहिती पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिली. भारताचे थेट नाव न घेता ते म्हणाले, ‘पाकिस्तानमध्ये दहशत पसरवण्याचे काम कोण करत आहे, हे सबंध जगाला माहित आहे’, अशा शब्दांत त्यांनी भारतावर अप्रत्यक्ष आरोप केला.
एनअायए च्या मागणीला केराची टोपली …
१. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले, ”कुलभूषण जाधव यांच्या अटकेनंतर पाकिस्तानामध्ये कोण दहशतवाद पेरत आहे, याचा पुरावा मिळाला.”
२. पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारताच्या एनअायए ला पाकिस्तानमध्ये परवानगी देण्यात येणार नाही, असे संकेतही त्यांना दिले.
३. त्यांनी म्हटले, दोन्ही देशात कुठलाही व्यवहार नसून तडजोड होत आहे.
४. एनअायए ला पाकिस्तानात तपास करू देण्याची मागणी भारताने केली होती.
५. एवढेच नाही तर दहशतवादी मसूद अजहर याच्या संघटनेवर जागतिक पाळीवर बंदी आणण्याविरोधात चीनने मत दिले. त्याचे त्यांनी कौतुकी केले.
संदर्भ : दिव्य मराठी