थिरूवनंतपूरम् : शबरीमला मंदिरात जाणार्या महिलांना सरकार रोखणार नाही; मात्र त्याच वेळेस त्यांना सुरक्षा देण्याचीही कोणती योजना नाही, असे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे.
शबरीमला मंदिरात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याची अनुमती आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या पूर्णपिठाकडे पाठवले आहे; मात्र त्या वेळेस महिलांना मंदिरात जाण्यास स्थगिती लावली नाही. या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने वरील विधान केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात