नवी मुंबई : सानपाडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधना आणि गुणवृद्धी शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. स्नेहा हरमळकर यांनी साधनेचे आयुष्यातील महत्त्व आणि अपरिहार्यता समजावून सांगितली. साधनेतील प्रायोगिक भाग महत्त्वाचा असून साधनेनेच येणार्या काळात आपण टिकू शकतो, हे स्पष्ट केले.
दुसर्या सत्रात डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी साधनेच्या जोडीलाच स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. ‘या प्रक्रियेमुळे साधनेच्या मार्गात अडथळे आणणार्या दोषांवर मात करता येते आणि दोष, पाप यांचे परिमार्जन करण्यात खर्ची होणारी अमूल्य साधना वाचते’, हेही लक्षात आणून दिले. या प्रक्रियेचा उपयोग व्यवहारातही सर्वांनाच होतो. ही प्रक्रिया म्हणजे सुखी आणि आनंदी जीवनाची किल्ली आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
क्षणचित्रे
१. शिबिरातील मार्गदर्शनाच्या वेळी उपस्थित जिज्ञासूंचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. ते प्रश्न विचारत होते आणि उत्तरेही देत होते.
२. एका जिज्ञासूंनी कागद आणि पेन मागून घेत मार्गदर्शनातील सूत्रे लिहून घेतली.
३. वाचक श्री. लक्ष्मण उरसळ यांनी ‘हे शिबिर पुष्कळ चांगले झाले’, असे सांगून असे शिबिर वेळोवेळी घेण्याची मागणीही केली. त्यांनी शिबिरात जिज्ञासेने सहभाग घेतला.
४. जिज्ञासूंना दोष निर्मूलन प्रक्रियेचा भाग विशेष आवडला. ‘हा भाग आणखी सविस्तरपणे घ्यावा’, असे सर्वांनीच सांगितले.