मंदिर विश्वस्तांनी अचानक घेतलेला निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. हा निर्णय घेतांना देवस्थानाने शंकराचार्य, संत, धर्माचार्य यांचे मत विचारात घेणे आवश्यक होते. विश्वस्तांनी रूढी, प्रथा, परंपरा यांच्यासह धर्मशास्त्राचे पालन होत आहे ना याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचे असतांना असा परपरस्परविरोधी निर्णय घेणे हा हिंदूद्रोह आहे. याचा धर्मप्रेमी हिंदूंनी विरोध केला पाहिजे ! – संपादक, हिंदुजागृती
शनिशिंगणापूर : शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्यावर सर्वांनाच प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय श्री शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी घोषित केला आहे. या निर्णयामुळे आता श्री शनिदेवाच्या चौथर्यावर पुरुष आणि महिला यांना दर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे आणि इतर सर्व विश्वस्त यांनी एकमताने हा निर्णय घेतला.
गुढीपाडव्यानिमित्त ग्रामस्थानी चौथर्यावर जाऊन श्री शनिदेवाला गंगाजलाभिषेक केला. त्यानंतर विश्वस्तांनी हा निर्णय घोषित केला. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, या निर्णयामुळे स्त्री-पुरुष समानता येईल. (स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये देवाने कोणत्याही स्तरावर समानता निर्माण केलेली नसतांना अशा प्रकारचे दिशाभूल करणारे विधाने करणार्या तृप्ती देसाई अज्ञानीच होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्या ८ एप्रिल या दिवशी दुपारीच शनिशिंगणापूर येथे चौथर्यावर जाऊन दर्शन घेणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात