Menu Close

‘#BoycottDabangg3’ हा ‘हॅश टॅग’ ‘राष्ट्रीय ट्रेंड’मध्ये द्वितीय स्थानी

‘#BoycottDabangg3’ हा ‘हॅश टॅग’ ‘राष्ट्रीय ट्रेंड’मध्ये द्वितीय स्थानी

२० डिसेंबर २०१९ या दिवशी प्रदर्शित होत असलेल्या सलमान खान यांच्या ‘दबंग ३’ या हिंदी चित्रपटातील ‘हुड हुड दबंग’ या गाण्यात साधू आणि देवता यांंना गाण्यावर विक्षिप्त हावभाव करत पाश्‍चात्त्य पद्धतीने नाचतांना दाखवण्यात आले आहे. तसेच यामध्ये भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि शिव यांना आशीर्वाद देतांना दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) निवेदन सादर केले. समितीने निवेदनात वरील आक्षेपार्ह भाग वगळल्याविना चित्रपटाला अनुमती देऊ नये, अशी मागणी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे याचा विरोध म्हणून धर्मप्रेमी हिंदूंनी ट्विटरवर ‘#BoycottDabangg3’ हा ट्रेंड झालेला दिसून आला. या ट्रेंडमध्ये ‘बॉलीवूड हिंदुविरोधी कसे आहे?’, ‘हिंदूंच्याच देवता, साधू, संत, देवता यांंचा नेहमी अवमान केला जातो’; ‘अन्य धर्मियांच्या श्रद्धांविषयी असे धाडस कधी का केले जात नाहीत ?’ अशा आशयाच्या अनेक ट्वीट्स धर्मप्रेमींनी केल्या, तसेच चित्रपटाला अनुमती न देण्याची मागणीही केली गेली.

दबंग-3 चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न देण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

साधूंना नाचतांना दाखवणारा सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवेल का ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

सलमान खान फिल्मद्वारे येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या दबंग-3 या हिंदी चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात हूड-हूड दबंग-दबंग या गाण्यामध्ये हिंदु साधू, तसेच भगवान शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अवमान करण्यात आला आहे. सलमान खानबरोबर साधूंना पाश्‍च्यात्त्यांप्रमाणे हिडिस आणि आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. त्यामुळे समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सलमान खानने हिंदु साधूंचा अवमान केला आहे, तशा प्रकारे मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवेल का, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे निवेदनाद्वारे दबंग 3 या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग वगळावेत अन् तोवर या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

या चित्रपटातील एका गाण्यात एका नदीच्या घाटावर अनेक साधूंना हिडिस आणि आक्षेपार्ह पद्धतीने नाचतांना दाखवले आहे. काही साधूंना पाश्‍चात्त्यांप्रमाणे गिटार वाजवतांना दाखवले आहे. काही साधूंना त्यांच्या जटा-केस गाण्याच्या चालीवर ठेका धरत उडवतांना दाखवले आहे. तसेच ते साधू सलमान खानसोबत नाचतांनाही दाखवले आहे. तसेच सलमान खान यांना भगवान शिव, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रुपातील पात्रे आशीर्वाद देतांनाही दाखवले आहे. अशाप्रकारे साधूंना नाचतांना दाखवणे, देवतांचे मानवीकरण करणे आदी गोष्टींतून हिंदु साधू आणि देवता यांचा अवमान करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका गाण्यातील हे चित्रण आहे; संपूर्ण चित्रपटातही अशाप्रकारे देवता आणि साधू यांचा अवमान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सेन्सॉर बोर्डाने ‘दबंग-3’ चित्रपटातून होणारे हिंदूंच्या श्रद्धास्थांनाचे, तसेच भारतीय संस्कृतीचे केले गेलेल्या विडंबनाचे प्रसंग तात्काळ काढून टाकावेत, तोवर चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *