‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ संमत केल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार !
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले; आसाममध्ये ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ लागू करून आता ती देशभरात लागू करण्याची घोषणा करून हिंदूंवर वर्षानुवर्षे होणार्या अन्यायावर उपाय काढला जात आहे. आता मोदी सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान सह आजूबाजूच्या अन्य देशांतून भारतात आलेल्या हिंदु, शीख, बौद्ध, जैन, पारसी धर्मीय शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देणारे ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ संमत केले. हा निर्णयही अत्यंत स्तुत्य असून हिंदु जनजागृती समिती या निर्णयाचे स्वागत करते आणि जगभरातील निर्वासित हिंदूंना सामावून घेतल्याबद्दल केंद्र शासनाचे आभारही मानते. आता विदेशातील निर्वासितांचा प्रश्न सुटला आहे; पण आपल्या देशात रहाणार्या ५ कोटीपेक्षा अधिक बांगलादेशी, पाकिस्तानी, रोहिंग्या मुसलमान घुसखोरांचा प्रश्न शिल्लक आहे. या घुसखोरांमुळे देशाच्या सर्व व्यवस्थांवर अतिरिक्त भार पडत असून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या घुसखोरांना भारतातून त्वरित हाकलून लावावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
हिंदु जनजागृती समितीने पाकिस्तान, बांगलादेश आदी देशांतील हिंदूंवर होणार्या अत्याचारांबाबत वेळोवेळी आवाज उठवला होता. वेळोवेळी आंदोलन करून याविषयाला वाचा फोडली होती. प्रतीवर्षी होणार्या ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’तही याविषयी ठराव संमत करून सरकारकडे मागणी केली होती. आज ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे. या निर्णयाने जगभरातील निर्वासित हिंदूंना जेवढा आनंद झाला असेल, तेवढाच आनंद आम्हालाही आहे. समितीसह ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’च्या वतीनेही मोदी सरकारचे आभार मानतो, असेही श्री. शिंदे या वेळी म्हणाले.